शारीरिक गरजा, व्यथा, काळजी, मानसिक रोग, आजार, सेक्स, पाळी, अनैतिक संबंध, वेश्या, स्वतःच शरीर अशे कित्येक विषय आहेत त्याबद्दल आपण खुलेपणाने बोलत नाही... मित्र आपापसात बोलतात आणि मैत्रीणिही.. पण त्याबद्दल एक डाऊट फुल नजरेने बघितलं जात आणि बोललही जात... तितकी इन डिटेल चर्चा आपण त्यावर कधी करत नाही... नवरा बायको ही नाही, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ही नाही, आई आणि मुलगी ही नाही आणि आई आणि मुलगा तर दूरची गोष्ट...
2
खरतरं आपल्या सर्वांना लहानपणापासूनचं "स्त्रीच्या शरीराबद्दल" कमी माहिती मिळत आलीये आपल्या घरातून...
म्हणजे पाळीचा विषय असला तर आई आणि मुलगी आपापसांत चर्चा करणार... पॅड लपून ठेवणार.. बाबांना विचारलं तर नेहेमीप्रमाणे, डोळे वटारून "आपापलं काम कर" अशी ताकीद मिळणार... म्हणजे सगळंच गूढ.. सेम गोष्ट स्त्रियांच्या अंतर्वस्त्राबाबतही... जेवढ्या नॉर्मल पणे आपले कपडे (स्पष्ट बोलायचं झालं तर "चड्ड्या") दोरीवर वाळत घातले जातात तेव्हड्याच नॉर्मलपणे स्त्रियांचे कपडे का नाही वाळत घालत आपण....??
3
यात एवढं लपवण्यासारखं काय ए....??
जसा पुरुष तशी स्त्री...
जसं आपण आतमध्ये बनियन आणि अंडरवेअर घालतो अगदी सेम त्या स्लिप, ब्रा आणि अंडरवेअर घालतात... मग यात लपवायच ते काय...??
या सगळ्या गोष्टी आपल्या लहानपणापासून लपवून ठेवल्याने नंतर आपलं त्यांच्याबद्दलच curiosity वाढत जाते... जी नंतर "हवस" मध्ये रूपांतरित होते...
याला आपला अख्खा समाज जबाबदार आहे.. कारण आपण त्याबद्दल कधी चर्चा नाही केली..
4
तशीच गोष्ट पाळी बाबत...प्रत्येक बाईला, मुलीला पाळी येते... त्यात वावगं काय...?तुमच्या बोटांमधून जर कट लागून रक्त निघायला लागलं तर अख्खा घर तुम्ही डोक्यावर घेता तर ५-६ दिवस अवघ रक्ताळलेलं शरीर घेऊन ती जेव्हा फिरत असते तेव्हा काय हाल होत असेल तिचे...
शहरात याबद्दल जागरूकता पसरत चाललीये.. एक बहीण आपल्या भावाला सांगते याबद्दल.. एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंड ला सांगते पाळी आली की.. मैत्रीण ही सांगते मित्राला... पण ग्रामीण भागात...??
जी स्त्री महिनाभर घर सांभाळते तिला जेव्हा पाळी येते त्या दिवसांत घरात कुणी विचारत ही नाही...
5
हे मी स्वतःच्या डोळ्यांनी गावी पाहिलंय... आणि जेव्हा आईला विचारलं तर स्वतः आई "तू तुझं तुझं काम कर" असं म्हणाली होती... म्हणजे कमीत कमी आपल्या आईने तरी याबद्दल खुलासा करावा असं मला तेव्हा वाटलं होतं...
गावी आजही कापडाचा वापर सर्रास केला जातो.. पॅड लावला तर त्याची विल्हेवाट नीट लावली जात नाही.. आणि शहरांतही कितीही मॉडर्न लोकं झाले तरीही गणपती, नवरात्र, सणांमध्ये जर तिला पाळी आली की वाळीत टाकलं जात.. बाहेर जायला मज्जाव असतो...ग्रहण असलं की केसं न धुणाऱ्या मुलीही आहेत या जगात...😒
6
लोकांना कोण सांगणार की Periods हा प्रॉब्लेम नसतो तर तो न येणं हा प्रॉब्लेम असतो...
*तिची पाळी तुमच्या सणांमध्ये नाही तर तुमचे सण तिच्या पाळीमध्ये आलेत....!!*
कित्येक शहरी आणि जॉब करणाऱ्या स्त्रियांना पाळी पुढे ढकलताना गोळ्या घेताना पाहिलंय आणि गर्भाशयाच्या ऑपरेशन नंतर तिला पाळी नाही येणार म्हणून लोकांना खुष होताना पाहिलंय...
इतिहास साक्षी आहे की स्त्रीला *गुलामीत ढकलायला स्त्री स्वतः जबाबदार होती आणि त्या परतंत्र्यातून बाहेर काढायला सुद्धा स्त्रीलाच पुढाकार घ्यावा लागलाय....*
7
पाळी ही निसर्गाने (ज्याने सृष्टी निर्माण केली असे तुम्ही मानता तो) स्त्रीला दिलेली नैसर्गिक गोष्ट आहे... त्यामुळे पाळी आल्यावर तो निसर्ग (तो देव, अल्लाह, येशू, इ.) कशाला तुम्हाला त्यापासून दूर ठेवेल...??
ही सगळी नियमं धूर्त पुरुषप्रधान संस्कृतीने निर्माण केलीत कारण त्यांना genuinely स्त्री पुढे गेलेली कधीच आवडत नाही... एवढं सगळं साधं आणि सोप्पं आहे... त्यामुळे आजपासून बिनधास्त त्यावर चर्चा करायला शिका, जोक्स करा आणि ओरडून अभिमानाने सांगा "मला पाळी आलीये....❣️"

No comments:
Post a Comment